शनिमंदिरास कोरोनाची साडेसाती,देणगीवर मोठा परिणाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- शनिअमावस्येला होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिमंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच तहसीलदार नेवासे यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.

त्यामुळे शनिआमावस्येला शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली. शनी अमावस्येला प्रथमच शनिमंदिर बंद ठेवण्यात आले. मंदिर बंदच्या निर्णयामुळे दोन दिवसांत होणारी आर्थिक उलाढाल यावेळेस झाली नाही.

कोरोनामुळे आठ महिने व्यवसाय बंद होता. तो आर्थिक तोटा सहन करत कसेबसे दुकान चालू झाले होते. पण परत लॉकडाऊन पडतो की काय या भीतीने सर्व व्यावसायिक हवालदिल झाले.

न्यायदेवता शनिदेव या कोरोना संकटतून सगळ्यांना लवकर बाहेर काढो, हीच प्रार्थना, असे व्यावसायिक संदीप डिके म्हणाले. प्रशासनाच्या सूचनेनुसार देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिमंदिर व मंदिर प्रवेश पूर्णतः बंद ठेवण्यात आले होताे.

कोरोना बचावाची संपूर्ण काळजी घेऊन उपाययोजना केल्या होत्या. तेल, प्रसाद व देणगीवर मोठा परिणाम झाला, असे शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24