अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जिल्ह्यात दरदिवशी हजारांच्या संख्येने रुग्णांची भर पडते आहे. यातच जिल्ह्यात मृत्युदर देखील वाढला आहे.
यामुळे प्रशासन देखील चक्रावरून गेले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांचा बेफिकीरपणा कायम आहे. नागरिक कोरोनाच्या संकटाला अद्यापही गंभीर घेताना दिसत नाही आहे.
यामुळे भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.
शहरातील, सावेडी उपनगर निर्मल नगर व तपोवन रोड परिसरात अनेक हुल्लडबाज तरुणांचे टोळके दिवसभर रस्त्याने विनाकारण भटकंती करताना दिसतात. तसेच हे तरुण एकत्र जमून रस्त्यावर ठिकाणी उभा राहतात.
काही जणांच्या तोंडाला मास्कही नसते. त्यामुळे पोलिसांनी उपनगरात गस्त वाढवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.