अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अमेरिकेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना. एक मार्चनंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेत रोज दोन हजार मृत्यू होत असल्याने समोर आले आहे. टेक्सास आणि फ्लोरिडा ही सर्वाधिक प्रभावित राज्ये आहेत.

येथे देशातील एकूण मृत्यूंच्या ३० टक्के मृत्यू होत आहेत. फ्लोरिडात ५६ टक्के लोकांना लस मिळाली. येथे दररोज ३५३ वर मृत्यू होत आहेत. टेक्सासमध्ये ५० टक्के लोकांना लस दिली गेली.

येथे रोज सरासरी २८६ मृत्यू होत आहेत. लसीकरणानंतर करोना पीडित रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे , अमेरिकेत आतापर्यंत ५४ टक्के लोकांना लस टोचण्यात आली आहे.

सीडीसीच्या जीनोम सर्व्हिलन्सच्या संशोधनानुसार अमेरिकेत कोरोना रुग्ण वाढीमागे डेल्टा व्हेरियंट आहे. अमेरिकेतील ९९ टक्के रुग्णांत हा व्हेरियंट आढळला आहे. कोरोना हॉट स्पॉटमध्ये निश्चित ट्रेंड दिसला नाही.

कमी लसीकरण झालेल्या क्षेत्रांसह ६९% लसीकरण झालेल्या व्हेरमॉन्टमध्येही जास्त रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेतील प्रख्यात डॉ. एंथनी फाउची यांनी म्हटले की, लसीच्या बुस्टर डोससाठी घाई करू नये.

दोन्ही डोस घेतल्यानंतरच बुस्टर डोस घ्यावा. अमेरिकी औषधी नियामक एफडीएच्या मते फायझर बायोएनटेकचा बुस्टर डोस ६५ वयांपुढील लोकांनाच दिला जावा.