अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न पडत आहे.
राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
तर या महामारीमुळे ५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे.
शुक्रवारी दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११,३४४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.