कोरोनाचा प्रकोप ! दहा दिवसात कोरोनाच्या आठ हजार बाधितांची भर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ७ हजार ८९० इतके बाधित झाले आहेत. त्यामध्ये दर दिवसाला सरासरी ७०० जण कोरोनाबाधित होत आहेत. दरदिवसाला १३ ते १५ हजार इतक्या कोरोना वाचण्या होत आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर हा ४ ते ६ टक्के इतका आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पारनेर आणि संगमनेर तालुक्यांत रोज सरासरी शंभर रुग्ण वाढत आहेत. दिवसाला सातशे ते आठशे रुग्ण आढळून येत आहेत. पारनेर आणि संगमनेर या दोन तालुक्यांत लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या २५ टक्के, तर दुसरा डोस घेतलेल्या म्हणजे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही १० टक्केच इतकीच आहे. दरम्यान कोरोनाविरोधातील लढ्याला लसीचा बुस्टर डोस मिळत असल्याने आरोग्य क्षेत्राला आलेली मरगळ काही अंशी का होईना झटकून निघत असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र नागरिकांनी सतर्कता व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाची तिसरी लाट येण्यास आपलाच बेजबाबदार पणा कारणीभूत ठरू शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24