कोरोनाच्या अफवेमुळे शाळा झाली रिकामी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.त्यातच नांदूर ता.राहाता येथे प्रवरा माध्यमिक विद्यालयात काल दुपारी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गावात कोरोनाचे पेशंट वाढले म्हणून अफवा पसरवली.

त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेण्याची घाई केली. नेहमी प्रमाणे सकाळी शाळा भरली, पण कोरोनाच्या अफवेमुळे शाळेतील मुलांना घरी नेण्यासाठी पालकांनी गर्दी करून केले.

या अफवेमुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे.तरी अशा अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये,असे आवाहन प्रवरा माध्यमिक विद्यालय नांदूर यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24