अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील असे एकही ठिकाण शिल्लक राहिलेले नाही, जिथे कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही आहे.
खासगी कार्यालयसह आता सरकारी कार्यालयांमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे मोठी दक्षता घेतली जात आहे.
यामुळे नगर शहरातील एका महत्वपूर्ण सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे.
हे सरकारी कार्यालय दुसरे तिसरे कोणते नसून शहरातील जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा मोठा फैलाव झाल्याचे निष्पन्न झाले होते.
नगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अभ्यागतांना ३० एप्रिल पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
काही कामासाठी अभ्यागतांना प्रवेश हवाच असेल तर आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा नकारात्मक अहवाल असणं बंधनकारक आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा परिषदे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत काम घेऊन येणार्यांना आधी करोना चाचणी बंधनकारक आहे.