नगरसेवक गणेश भोसले यांना उपमहापौर पदाची संधी द्यावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- नगरसेवक गणेश भोसले यांची काम करण्याची कार्यपद्धती शहरातील अनेकांना भावल्याने अनेक उपक्रमात त्यांनीही सहभाग दिलेला आहे.

एक अभ्यासू व कायम तत्पर नगरसेवक म्हणून ख्याती असलेल्या गणेश भोसले यांना उपमहापौर पदाची संधी दिल्यास शहराच्या विकासात ते नक्कीच भर घालतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष मजबूतीसाठीही त्याच उपयोग होईल.

आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या नगर विकासात उपमहापौर पदाच्या माध्यमातून गणेश भोसले योगदान देतील, असा विश्‍वास माजी नगरसेवक संजय चव्हाण यांनी व्यक्त केला.

श्री.चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी प्रभागाबरोबरच नगर शहरात आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. प्रभागातील सर्व कॉलनी, गल्ली,

अपार्टमेंट आदिंसह बुरुडगांव परिसरत विकास कामे करुन एक आदर्श प्रभाग निर्माण केला आहे. प्रभागातील अनेक ओपन स्पेसचे सुशोभिकरण, ज्येष्ठ नागरिक भवन, साईनगर येथील निसर्ग सौदर्याने नटलेली विस्तीर्ण बाग, काँक्रीटचे रोड, स्ट्रीट लाईट,

मोठी ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाईपलाईन अशा विविध विकास कामांमुळे एक आदर्श प्रभाग म्हणून या भागाची ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासबाबतही महत्वपूर्ण निर्णय घेऊन अनेक योजना मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशिल असतात.

गेल्या 20-25 वर्षांपासून महानगरपालिकेतील महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचे योगदान राहिले आहे. शहर विकासाला चालना देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे विश्‍वासू म्हणून त्यांची ओळखले जातात.

नगरपालिका असतांना उपनगराध्यक्षपदापासून मनपा स्थापन झाल्यापासून विविध पदाच्या माध्यमातून शहरातील विकास कामांत योगदान दिले आहे. आता त्यांना उपमहापौर पदाची संधी दिल्यास त्यात आणखी भर घालतील, असेही श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24