अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत (अताएसो) मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. अध्यक्ष व सचिवांचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप अताएसो बचाव समितीने केला. सर्वसाधारण सभा घेण्याची मागणीही करण्यात आली.
अताएसो बचाव आंदोलन समितीची बैठक राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झाली. २००८ पासून अध्यक्ष जे. डी. आंबरे व सचिव यशवंत आभाळे काम करत असून कार्यकारिणी सदस्य व निमंत्रित विश्वस्तांना शैक्षणिक व आर्थिक कारभारात विश्वासात घेतले जात नाही.
हा माज उतरवण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी करू. ती मान्य न झाल्यास धर्मदाय आयुक्तांकडे चौकशीची मागणी करु. त्यात समाधान झाले नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेऊ. तेथेही उशीर होत असेल, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे निमंत्रित विश्वस्त दशरथ सावंत यांनी सांगितले.
संस्थेच्या कारभारावर सर्वांनी आपल्या भाषणात झोड उठवत कारवाई करण्याची मागणी केली.खांडगे यांनी अनेक गोष्टींवर बोट ठेवून मुलींच्या वसतिगृहात एक कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, कोंडाजी ढोन्नर, दादापाटील वाकचौरे, मीनानाथ पांडे, प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, डाॅ. डी. के. सहाणे, सुरेश गडाख, संपत नाईकवाडी, अरुण रूपवते, विनोद रासणे, सोन्याबापू वाकचौरे, भानुदास तिकांडे, दिलीप शहा, के. बी. हांडे, दशरथ रोकडे, डाॅ. दशरथ बंगाळ, शांताराम गजे, सुरेश खांडगे, माधव आवारी, नितीन जोशी, मनोज गायकवाड, सुरेश शिंदे, प्रशांत धुमाळ, हिम्मत मोहिते, नामदेव साबळे आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |