सहजीवन सुखी करण्यासाठी समुपदेशन उपयुक्‍त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-समुपदेशन म्हणजे दरवेळी कोणी सायकोलॉजिस्ट असण्याची गरज नाही, तुमची मोठी बहीण, भाऊ किंवा तुम्हाला पूर्णपणे ओळखणारे मित्र-मैत्रीण किंवा सहकारी अगदी कोणीही तुमचे समुपदेशक होऊ शकतो.

नवरा-बायकोचे नाते हा विषय न संपणारा आहे. तुमच्या लग्नाच्या नात्यात प्रेमच नसेल, तर त्या नात्याला अर्थ असतो. नाहीतर ते नाते केवळ नावापुरतेच राहते. अनेकदा आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टींचे इतके वाईट वाटते की, आपण आपल्या नात्याबाबत पुन्हा विचार करतो.

तुम्ही जर तुमच्या नात्याबाबत पुन्हा विचार करत असाल, तर तुम्हाला जाणून घेणे गरजेचे असते. प्रत्येक व्यक्‍तीची स्पेस जपणे गरजेचे असते. तुमच्या नात्याबाबत तुम्ही गोंधळला आहात, तर स्वत:ला आणि पार्टनरला थोडा ब्रेक द्या. यादरम्यान दोघांना एकमेकांचे महत्त्व समजेल आणि नात्याबाबत तुम्ही पुन्हा विचार कराल.

कारण काही कारणांमुळे तुमचे नाते निरस झाले असेल त्यामुळे ब्रेक गरजेचा आहे. अनेकदा आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी पटत नाहीत. मात्र त्याबद्दल आपण मोकळेपणाने बोलत नाही आणि आतल्या आत कुढत बसतो. यामुळे दुरावा वाढतो. यासाठी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि समस्याचे निराकरण करा.

अनेकदा आपण नाते जपण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करतो. कारण यापेक्षा आपल्याला चांगले मिळणार नाही, असे वाटत असते. या नात्यासाठी आपण अनेकदा तडजोडीही करतो. मात्र असे बिलकुल करू नका. चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा सिंगल राहिलेले बरे. रोजच्या ताण-तणावाचे सामोरे जाण्याची परिपक्वता दोघांमधे येण्यासाठी समुपदेशनाचे साहाय्य होते.

जोडीदाराकडून आपल्याला आदर्श अपेक्षा असतात, परंतु आदर्श असं काहीही नसतं आणि अपेक्षा ठेवायला हरकत नसते, पण त्याचा अट्टहास होता कामा नये समुपदेशनामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या नात्यात जायचे आहे की नाही, याचा मुळापासून विचार करायला मदत होते.

समाजव्यवस्था आणि कुटुंबाचा रेटा म्हणून अनेकजण विवाह करतात, परंतु ते नातं टिकून राहणं अवघड होऊन बसतं. हे सर्व टाळण्यासाठी समुपदेशन मदत करते.

समुपदेशन म्हणजे दरवेळी कोणी सायकोलॉजिस्ट असण्याची गरज नाही, तुमची मोठी बहीण, भाऊ किंबा तुम्हाला पूर्णपणे ओळखणारे मित्र-मैत्रीण किंवा सहकारी अगदी कोणीही तुमचे समुपदेशक होऊ शकतो, अगदी तुम्हीदेखील प्रामाणिकपणे विचार करून स्वत:चे समुपदेशन करू शकता.