अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्या शिक्षकांचे सरसकट करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून पारीत व्हावेत.
या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर जाऊन पूर्ण केले.
त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त प्राथमिक शिक्षक हा एकच घटक लसीकरणाशिवाय काम करत होता. इतर अनेक जिल्ह्यात शिक्षकांचे प्राधान्याने दोन्ही डोसचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले.
अहमदनगर जिल्हा प्रशासनानेच याबाबत उदासीनता का दाखवली. शिक्षकांना लस नाही तर मग काम तरी का दिले जाते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टीचा प्रतिनिधिक निषेध म्हणून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसाचे आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
कोविड १९ महामारीच्या अनुषंगाने सर्व प्राथमिक शिक्षकांची गणना फ्रंटलाइन वर्कर म्हणून करावी.सर्व शिक्षकांचे सरसकट लसीकरण करावे आदी प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आले.