अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- दारू पिण्यासाठी आईने पैसे दिले नाहीत, म्हणून रागाच्या भरात आईचा चाकूने भोकसून खून करून क्रौर्याची परिसीमा गाठत आईचे काळीज तिखेट मीठ लावून तळुन खाणाऱ्या नराधम मुलास न्यायालयाने मरेपर्यंत फाशी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सुनील रामा कुचकोरवी असे त्या मुलाचे नाव असून ही घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, कोल्हापुरातील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीत राहणारा सुनील कुचकोरवी याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी,
दारूला पैसे दिले नाहीत म्हणून स्वत:ची आई यल्लवा कुचकोरवी (६२) हिच्या शरीराचे चाकू, सुरी, सत्तूरने तुकडे करून तिचा निर्दयीपणे खून केला होता, तसेच तिच्या मृतदेहाची विटंबना करत अनेक अवयव बाहेर काढून किटन ओट्यावर ठवले होते.
तर काही अवयव चक्क त्याने तिखट, मीठ लावून तळले होते. अवयव खाल्ल्याने त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. यानंतर तो पळून जाताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
प्रकरणाचा तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अॅड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. एकूण ३४ पैकी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.