“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही, असे दीपक केसरकर म्हणाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता विधीमंडळात अध्यक्षांची निवड झाली आहे. आतापर्यंत बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. अविश्वास ठराव असो वा अपात्रतेचा विषय, हे आता निकालात निघाले आहेत. अपात्रतेच्या विषयावर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांना आता अर्थ नाही असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. 

विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.