ताज्या बातम्या

Covid 19 : राज्यात पुन्हा मास्क सक्ती? राजेश टोपे यांचा महत्वाचा निर्णय

Published by
Renuka Pawar

मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) उद्रेक होत असताना यावेळी कोरोनाला अडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) सतर्क झाले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पुन्हा मास्क वापरावा लागणार का? यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे. तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही.

मास्कचा (Mask) वापर न केल्यास दंडही ठोठावण्यात येणार नाही. मात्र, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी बोलताना केले आहे.

यासोबतच राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित (Dr. Rahul Pandit) म्हणाले की, आपल्याला कोरोना व्हायरस सोबत जगावं लागेल, आपलं दैनंदिनी काम करावं लागेल, त्यामुळे कुठेही घाबरून जायचं किंवा पॅनिक व्हायचं कारण नाही असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली आहे.

नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती.

मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत.

Renuka Pawar