पारनेर तालुक्यात १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून, या महाजंगी कोव्हिड सेंटरचे १४ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष पुढाकारातून या महाकोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हे कोव्हिड सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. भाळवणीच्या महाकोव्हिड सेंटरमध्ये १००० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०० ओटीची (ऑक्सिजन) व्यवस्थाही करण्यात आली आहे.

भाळवणीतील १ हजार बेडच्या कोव्हिड सेंटरमुळे नागरिकांची बेडअभावी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. मध्यंतरी आ.निलेश लंके यांच्या खास पुढाकारातून पारनेर तालुक्यात अशाच प्रकारचे महाकोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते.

त्या कोव्हिड सेंटरमध्ये ५ हजारापेक्षा अधिक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. कोरोनाचा प्रादुर्भात दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याने आ. लंके यांनी नागरिकांसाठी महाकोव्हिड सेंटर उभारले आहे.

आ.लंके यांचे सामाजिक, राजकिय आदी क्षेत्रात मोठे योगदान आहेच. याशिवाय त्यांनी आता आरोग्य क्षेत्रातही भरीव योगदान देत नागरिकांनी मोठा दिलासा दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24