अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे.
येथे रुग्णाना सर्वसुविधा मोफत फिल्या जातात. मात्र एवढ्या संपाच्या काळात आमदारांनी एवढे मोठे कोविड सेंटर कसे सुरु केले? हा प्रश्न सर्वांना पडतो आहे. तर याचे उत्तर खुद्द लंके यांनी दिले आहे.
केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार लंके यांनी सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. मी आमदारकीची निवडणूक देखील लोकवर्गणीतून लढवली होती.
माझ्याकडं संस्था नाही, किंवा साखर कारखाना नाही, म्हणजे मी काहीच करायचं नाही का? असा प्रतिप्रश्नच लंके यांनी केला.मी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा, मदतीचे अनेक हात पुढे आले.
दररोज मोठ्या प्रमाणात मदत येत आहे, कुणी रेशन देतंय, कुणी भाजीपाल देतंय तर कुणी रोख स्वरुपात देणगी देत असल्याचं लंके यांनी सांगितलं.
गावातील यात्रेला जसं वर्गणी आणि धान्य गोळा केलं जातं, तसंच इथं होत आहे. राज्यातून, देशातून आणि परदेशातूनही आम्हाला मदत मिळत आहे.
धान्याचा विचार केला तर 9-10 ट्रक धान्य आलंय. भाजीपाल्यासाठी रांग लागतेय. विशेष म्हणजे पुढील 1-2 महिन्यांसाठी जेवणाच्या पंक्ती बुक झाल्यात.
एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जसं लोकं मदत करतात. अगदी तशीच मदत मिळत आहे. विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्यात शिर्डी साईबाबांचं देवस्थान आहे.
तेथे ज्याप्रमाणे दान दिलं जातं, तसंच दान येथेही मिळतय. अशा शब्दात कोविड सेंटरला होणारी मदत आणि आर्थिक भार याबद्दल आमदार लंके यांनी सांगितले.