अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोव्हीड रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने छोटे व्यवसायीक, दुकानदार आणि व्यापा-यांची कोव्हीड चाचणी करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.
कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह येणा-यांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी शासन नियमाप्रमाणे देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. विविध व्यवसायांच्या निमित्ताने दुकानांमधुन तसेच भाजी खरेदी करण्यासाठी येणा-या नागरीकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने नियमावली तयार केली.
या नियमावलीचा एक भाग म्हणूनच व्यवसायीकांचे कोव्हीड टेस्ट करुण घेण्याची सुचना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिका-यांना केली होती. या उपक्रमातून रुग्णांचा शोध घेणेही सोपे झाले. ग्रामपंचायत पदाधिका-यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोव्हीड टेस्टचा सामुहीक उपक्रम राबविला.
दिवसभरात १९७ छोटे व्यवसायीक, भाजी विक्रेते आणि व्यापा-यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. यामध्ये अवघा एक रुग्ण कोव्हीड पॉझीटीव्ह आढळून आला. ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केलेल्या आवाहानाला सर्व व्यापारी, भाजीविक्रेते आणि छोट्या व्यापा-यांनी चांगला प्रतिसाद दिला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ.श्रीपाद मैड, डॉ.कापसे,डॉ.आकाश अंत्रे, स्नेहा लोनकर, वाड एस.जी, श्री.भोसले, शुभम शिंदे, शहाबान सय्यद, सुनिल खाडे यांनी कोव्हीड टेस्ट करण्यासाठी सहकार्य केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ.कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, प्रविण विखे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयुर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी सौ.कविता आहेर.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व्यवसायीकांची कोव्हीड टेस्ट करुन घेण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला. या उपक्रमामुळे सर्वांच्याच मनातील कोव्हीडची भिती दुर झाली.
गावातील रुग्ण संख्या रोखण्यातही या उपक्रमाची मोठी मदत झाल्याचे उपसरपंच गणेश विखे यांनी सांगितले. शासन नियमाप्रमाणानेच व्यवसाय सुरु करताना गर्दी रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.