कोसळधार ! ‘हे’ धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

यामुळे काही धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी साठण्यात वाढ झाली आहे. दारणा धरण लगतच्या भोवताली परिसरात पावसाची संततधार सुरु होती. या धारणाच्या पाणलोटात मागील 24 तासांत 119 मिमी पावसाची नोदं झाली.

1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1059 दलघफू इतका साठा होता. त्यात आज गुरुवारी सकाळी चांगली वाढ होऊ शकणार आहे. भावली 80 टक्क्यांवर पोहचु शकेल असा अंदाज आहे.

हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्याच्या सांडव्यावरुन पाणी ओव्हरफ्लो होऊ शकेल. ओव्हरफ्लो नंतर हे पाणी दारणात दाखल होते दारणाच्या पाणलोटातही इगतपुरी, घोटीला दिवसभर मुसळधार पाऊस बरसल्याने या धरणात बुधवारी सकाळी 60.51 टक्क्यांवर असलेला साठा आज सकाळी 6 पर्यंत 65 टक्क्यांहुन अधिक तयार होऊ शकतो.

68 टक्क्यांच्या पुढे सरकल्यानंतर या धरणातून विसर्ग सोडावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळनंतर याबाबतचा निर्णय कोणत्याहीक्षणी होण्याची शक्यता आहे. भावलीही 80 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दारणाच्या पाणलोटातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. इगतपुरी, घोटी परिसरात पावसाचा जोर कायम होता. दारणा चासाठा काल सकाळी 6 वाजता 60.51 टक्के इतका होता. तो आज गुरुवारी 65 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. रात्री उशीरापर्यंत हा साठा 68 टक्के होऊ शकतो. त्यानंतर या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कालचा दिवसभराच्या पावसाने रात्रीतून या धरणात चांगली आवक होऊ शकते. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 35 मिमी, घोटी येथे 72 मिमी, इगतपुरीला 95 मिमी पावसाची नोंद झाली.

रात्रीतून दारणात 424 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणाचा साठा वाढत आहे. दोन दिवसात दारणातून विसर्ग सुरु होण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24