Credit Card : क्रेडिट कार्डधारकांनी चुकूनही करू नये ‘या’ चुका, नाहीतर सापडाल कर्जाच्या जाळ्यात

Credit Card : क्रेडिट कार्ड हे अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. परंतु, क्रेडीट कार्डचा वापर योग्य झाला तर ते फायद्याचे ठरते. नाहीतर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

त्यामुळे कर्ज टाळण्यासाठी क्रेडीट कार्डचा वापर योग्य प्रकारे करा. त्याशिवाय क्रेडीट कार्डद्वारे फसवणुकीचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्यासाठी काळजीपूर्वक क्रेडिट कार्ड वापरा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

करू नका या चुका

क्रमांक 1

अनेकजण गरज नसताना क्रेडिट कार्ड घेतात. त्यामुळे ते अडचणीत येतात. गरज नसेल तर आणि बिल भरण्याची क्षमता नसेल तर क्रेडिट कार्ड घेऊ नका.

क्रमांक 2

अनेकांचा CIBIL स्कोर योग्य होण्यासाठी क्रेडिट कार्ड बनवण्यात येतात, परंतु विचार न करता आणि गरजेशिवाय कोणताही व्यवहार करण्याचे टाळा. नाहीतर तुम्ही आर्थिक कचाट्यात सापडाल

क्रमांक 3

अनेकजण क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यांच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात. त्यामुळे ते बिल भरण्यास सक्षम नसतात.

क्रमांक 4

अनेकजण त्यांच्या क्रेडिट कार्डमधून सर्व पैसे काढतात त्यानंतर ते ईएमआय करतात. परंतु ईएमआय चुकवताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.