Credit Card : आजकाल सर्वचजण क्रेडिट कार्ड वापरतात. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला असावी. आता यावर वेगवेगळ्या बँका वेगवेगळे फायदे देत आहेत. ज्याची माहिती ग्राहकांना नसते. जाणून घ्या सविस्तर.
वेगवेगळ्या ऑफर
खरंतर फ्लिपकार्ट-अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर रोज काही ना काही विक्री सुरू असते. यामध्ये, वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सने केलेल्या खरेदीवर काही सूट किंवा कॅशबॅक ऑफर मिळते. जर तुमच्याकडे त्या डीलसह क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला तेच उत्पादन इतरांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
क्रेडिट इतिहास
ज्यावेळी तुम्ही कर्जासाठी जाल त्यावेळी बँक सर्वात अगोदर तुमचा क्रेडिट इतिहास पाहत असते. क्रेडिट कार्ड हा कर्जाचा एक प्रकार असून तुम्ही त्याचा जितका जास्त वापर कराल तितका तुमचा क्रेडिट इतिहास तयार होतो. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास तर तुमचा क्रेडिट इतिहास जास्त मजबूत होतो.
अतिरिक्त पैसे कमवता येतील
तुम्ही कार्डद्वारे पेमेंट केल्याने तुम्हाला 30-45 दिवसांच्या याच कालावधीसाठी पैशावर अतिरिक्त व्याज मिळते. जर तुमची इच्छा असेल तर, तुम्ही शॉर्ट टर्म एफडी मिळवू शकता, तुम्हाला बचत खात्यात व्याज मिळेल.
रिवॉर्ड पॉइंट
तुम्ही जितके जास्त खरेदी करता तितके जास्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. जरी तुम्ही रोख रकमेने खर्च केल्यास तुम्ही क्रेडिट कार्डाप्रमाणेच खर्च केला असता, मात्र तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळाले नसते. एका रिवॉर्ड पॉइंटचे मूल्य २५ पैसे असून वेगवेगळ्या बँकांसाठी ते वेगळे असेल. तुम्ही हे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून, तुम्ही पैसे आणि शॉपिंग व्हाउचर मिळवता येईल. रोख किंवा शॉपिंग व्हाउचर द्यायचे की नाही हे कार्ड कंपनीवर अवलंबून असते.
वाचेल वेळ
जर तुम्ही विविध क्रेडिट कार्डांवर, पेमेंट केले तर पैसे परत करण्यासाठी तुम्हाला 30 दिवस ते 45 दिवसांचा कालावधी मिळतो. जर तुम्ही रोख पैसे दिले असते तर तुम्हाला लगेच पैसे भरावे लागतात. तुम्ही जरी ऑनलाइन पैसे भरल्यास तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात.
ईएमआय सुविधा उपलब्ध
तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला शॉपिंगवर EMI ची सुविधा मिळू शकते. तसेच तुम्हाला नो कॉस्ट EMI ची सुविधा मिळेल, ज्यात तुम्हाला EMI वर व्याज द्यावे लागणार नाही.