Credit Card Tips : क्रेडिट कार्डधारकांनो सावधान! चुकूनही करू नका या चुका, अन्यथा कायमचे व्हाल कर्जबाजारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card Tips : क्रेडिट कार्ड वापरताना अनेकनाकडून वेगवेगळ्या चुका होत असतात. या चुका होत असताना काहींना माहिती असते तर काहींना त्याबद्दल फारसे काही माहिती नसते. मात्र त्यांच्या या चुका त्यांना आर्थिक नुकसान देऊ शकतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना नेहमी काळजी घेणे महत्वाचे आहे.

अनेकजण आजकाल क्रेडिट कार्डाचा वापर करत आहेत. मात्र ते वापरताना अनेकदा विचार केला जात नाही. सतत क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर तुमच्यावरील कर्ज वाढवू शकते. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो.

क्रेडिट कार्डाचा वापर करणे म्हणजे तुमच्यावरील कर्जाचा बोजा वाढवणे होय. तसेच जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले कर्ज नियमित भरले नाही तर त्यावरील व्याज वाढत जाते आणि तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना खालील चुका कधीही करू नयेत.

1. वेळेवर पैसे न भरणे

क्रेडिट कार्ड वापरत असताना केलेल्या चुका तुमच्या अंगलट येऊ शकतात. तसेच तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. क्रेडिट कार्डद्वारे कर्ज काढल्यानंतर ते नियमित वेळेवर भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे कर्ज नियमित वेळेवर भरले नाही तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर व्होऊ शकतो.

तसेच घेतलेल्या कर्जाचे व्याज देखील वाढू शकते. जर तुम्हाला क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधून समस्या मिटवू शकता. तसेच तुमच्या बजेटमध्ये असेल इतकेच कर्ज क्रेडिट कार्डद्वारे काढा.

2. सतत क्रेडिट कार्ड वापरणे

अनेकदा क्रेडिट कार्ड धारक क्रेडिट कार्डचा वापर सतत करत असतात. कुठेही शॉपिंग करण्यासाठी गेल्यानंतर क्रेडिट कार्डचा वापर केला जात असतो. मात्र असे करणे तुमच्यासाठी कर्जाचा डोंगर निर्माण करणे ठरू शकते. क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले कर्ज पुन्हा फेडणे अश्यक होऊ शकते. त्यामुळे सतत क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळले पाहिजे आणि घेतलेले कर्ज नियमित भरण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

3. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्सकडे दुर्लक्ष करणे

क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही किती कर्ज घेत आहात आणि त्याची परतफेड किती करताय हे देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तसेच क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्याकडून किती व्याज आकारात आहे आणि तुम्ही घेतलेले कर्ज किती शिल्लक आहे हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटमेंट्सचे पाहणे गरजेचे आहे.

4. गरज असताना मदत न मागणे

अनेकदा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अनेकांकडे पैसे नसतात. मात्र क्रेडिट कार्डचे कर्ज भरण्यासाठी अनेकजण इतरांकडून मदत घेण्यास लाजत असतात. मात्र जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर बिल भरण्यासाठी इंटर्नकडून मदत घ्या आणि नंतर त्यांचे पैसे परत करा.