अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- पतसंस्थांनी ग्रामिण भागातील व्यक्तींना बचतीची सवय लावली आहे. पतसंस्थेमुळे खेड्यातील पैसा खेड्यात राहिला आहे.त्यामुळे ग्रामिण भागाची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.असे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केले आहे.
राहुरी तालुक्यातील आंबी येथे पेरणा पतसंस्थेच्या नविन इमारतीत शाखेचे स्थलांतरीत शुभारंभ माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव कोळसे हे होते.
यावेळी पेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे,व्हा.चेअरमन मच्छिंद्र शिंदे,देवळाली प्रवरा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे,अशोक थोरे,सुरेश निमसे,आंबीच्या सरपंच संगिता साळुंखे,
अमळनेरच्या सरपंच अरुणा जाधव,उद्धव कोळसे,विजय डुक्रे,विष्णू जाधव, किरण कोळसे,वसंतराव कोळसे,आबासाहेब वाळुंज,कुंडलिक खपके,विलास गागरे,नानाभाऊ कोतकर,दशरथ पोपळघट,श्रीकांत जगधने,
बाळासाहेब पवार,विलास तनपुरे ,वेणूनाथ कोतकर,एकनाथ सालबंदे पत संस्थेचे सर्व संचालक आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा.तनपुरे म्हणाले की,पेरणा पतसंस्थेने ग्रामिण भागात विश्वास संपादन केला आहे.
राष्ट्रीयकृत बँका पेक्षा पतसंस्थांनचे जास्त काम केले आहे.पेरणाचा इतरांनी आर्दश घेतला पाहिजे.माहात्मा गांधींजीच्या धोरणा नुसार खेड्यातील पैसा खेड्यात राहिला पाहिजे.बँका व पतसंस्थेत सर्व सामान्यांच्या ठेवी असतात.
याच ठेवीतुन व्यापारी व शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाते. ग्रामिण भागातील अर्थ व्यवस्था पतसंस्थांनी बळकट केली आहे.ग्रामिण भागात बचत करण्याची सवय पतसंस्थांनी लावली आहे.पैशाचे नियोजन कशा प्रकारे करावे हे पतसंस्थांनी शिकविले आहे.
असे तनपुरे यांनी सांगितले. माजी खा. तनपुरे पुढे म्हणाले की, पाणी हि राष्ट्रीय संपत्ती आहे.त्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.निळवंडे धरण झाल्याने पाण्याचे संकट उभे राहणार आहे.
1980 साली मुळा धरणातुन नगर शहर, सुपा व नगर औद्योगिक वसाहत,पांढरीचापुल आदी ठिकाणी पाणी दिले. 20 वर्षा नंतर पाण्याची अडचण निर्माण होणार आहे. हे लक्षात घेवून प्रवरा व मुळा नदीवर बंधारे बांधले होते. त्यामुळे आज काही प्रमाणात पाणी प्रश्न सुटला आहे.
नदीवर नविन बंधारे बांधण्यास परवानगी दिली जात नाही.नदी वरील बंधाऱ्याच्या पाण्यामुळे आपल्या कारखान्याला ऊस पुरवून इतर सहा कारखान्यास ऊस पुरविला जातो.भविष्य काळात पाण्याचे संकट उभे राहणार आहे.
त्यासाठी नविन पाणी उपलब्ध केले पाहिजे.पश्चिमेकडील पाणी पुर्वेस वळविले पाहिजे तरच नविन पाण्याची उलब्धता होणार आहे आसे तनपुरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांनी सांगितले की,पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हाभर आहे.
पतसंस्थेमुळे अनेकांच्या आर्थिक गरजा पुर्ण झाल्या आहेत.छोट्या व मोठ्या उद्योगांना अर्थसाहय्य केले आहे.कोरोना काळात दवाखान्यासाठी तातडीचे एक लाखा पर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिले.कोअर बँकींग लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
संस्थेला 28 वर्ष पुर्ण झाले आहेत.आंबी शाखेत 7 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.संस्थेचे वसुल भाग भांडवल 1कोटी 5 लाख 93 हजार 800 रुपये,निधी फंड 5 कोटी 92 लाख 90 हजार 206 रुपये,संस्थेचे येणे कर्ज 33 कोटी 31 लाख 99 हजार 403 रुपये,
गुंतवणुक 28 कोटी 66 लाख 2 हजार 884 रुपये,ठेवी 54 कोटी 40 लाख 62 हजार 359 रुपये,खेळते भाग भांडवल 64 कोटी 51 लाख 75 हजार 956 रुपये,
वार्षिक उलाढाल 395 कोटी 66 लाख 79 हजार 650 रुपये असुन संस्थेचा पारदर्शक कारभार व सभासदांचा विश्वास यावर संस्थेने 28 वर्षात मोठा पल्ला गाठला आहे.असे वाबळे यांनी सांगितले.