अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- वर्ष २०२०-२१ मध्ये वसंतदादा साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या वस्तू व्यापाऱ्यांना विकल्या होत्या. या प्रकरणात जीएसटीची रक्कम व्यापाऱ्यांकडून घेण्यात आली. पण ही थकबाकी जीएसटी म्हणून अदा केलेली थकबाकीच्या स्वरूपात असलेली रक्कम ही १२ कोटी ४४ लाख रूपये इतकी आहे.
व्यापाऱ्यांकडून जीएसटीच्या स्वरूपात रक्कम गोळा करूनही ती न भरल्या प्रकरणी आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध कारखाना म्हणून ओळख असलेल्या वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील तसेच आणखी १६ संचालकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटीच्या उपायुक्त असलेल्या शर्मिला विनय मिस्कील यांनी या प्रकरणात जीएसटी थकवल्यासाठीची तक्रार दाखल केली होती.
त्यामुळेच संजय नगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जीएसटीचे १२ कोटी रूपय़े थकवल्याप्रकरणी त्यांच्यासह आणखी १६ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारखान्याच्या कामगिरीत झालेल्या व्यवहारांमध्ये जीएसटीची रक्कम भरण्यात आलेली नव्हती. त्यामुळेच रक्कम थकवल्याप्रकरणी जीएसटी उपायुक्तांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारखान्याविरोधात झालेल्या कारवाईमुळे सांगली तसेच सहकार क्षेत्रातच एकुणच खळबळ माजली आहे.
एकंदरीतच ही कारवाई म्हणजे सांगलीतील कॉंग्रेसला मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे. राज्य जीएसटी कार्यालयात न भरल्यानेच जीएसटी कार्यालयाकडूनच ही कारवाई करण्यात आली आहे.