ताज्या बातम्या

केतकी चितळेविरूद्ध नाशिकमध्ये गुन्हा, आणखी एक तरुण अडकला

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर वादात सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यानंतर आता नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर नाशिकच्या एका युवकाविरूद्ध अशाच एका प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चितळे हिच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तिला अटकही करण्यात आली आहे.

आता नाशिक शहर सायबर पोलिसांत तिच्यावर शांतता भंग आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी फिर्याद दिली आहे.

याशिवाय नाशिकच्या बागलाणकर या ट्विटर अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या नाशिकमधील तरुणावर पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत या तरुणाने पोस्ट केली होती. हा तरुण नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून, सदर पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office