अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील अजय खैरे याला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्याने २४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत अजय नंदू खैरे वय २३ वर्षे राहणार देवळाली प्रवरा याच्या मृत्यू बाबत सुरवातीला आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
मात्र नंतर मयत अजय खैरे याची पत्नी मनिषा अजय खैरे हिने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, या घटनेतील आरोपी अनिल ऊर्फ कवट्या गायकवाड याने काहीएक कारण नसतांना मयत अजय नंदु खैरे यांस मारहाण केली होती.
त्या त्रासाला कंटाळुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने अजय खैरे याने दिनांक २४ जुलै रोजी रात्री १० ते २५ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान देवळाली प्रवरा आंबी रोड येथील ओढ्याजवळ एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली होती.
मनिषा खैरे हिच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल ऊर्फ कवट्या सुखदेव गायकवाड राहणार देवळाली प्रवरा. याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निरज बोकिल हे करीत आहेत.