अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबाजी गयाजी लंके यांच्याविरोधात बेकायदा खासगी सावकारी केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
निघोज येथील टपाल कर्मचारी नवनाथ लंके यांनी बाबाजी लंके यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर पुढील १८ महिने दरमहा अडीच हजार रुपये व्याज वसूल करण्यात आले.
व्याजाची रक्कम भरून मेटाकुटीला आलेल्या नवनाथ लंके यांनी पूर्ण रक्कम एकरकमी देतो परंतु काही रक्कम कमी करा, अशी विनंती सावकार बाबाजी लंके यांना केली.
सावकार लंके यांनी रक्कम कमी करण्यास नकार दिला. नवनाथ लंके यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला.
व्याजाने रक्कम घेणारे नवनाथ लंके यांनी मध्यस्थामार्फत सावकार बाबाजी लंकेे यांना व्याजाचे पैसे कमी करण्याची विनंती केली.
परंतु सावकाराने नकार दिला.सावकाराच्या ससेमिऱ्याला कंटाळून अखेर नवनाथ लंके यांनी पारनेर पोलिसांकडे बाबाजी लंके विरोधात तक्रार दाखल केली.