अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-लग्नाच्या वरातीसाठी गर्दी केली. तसेच साउंड सिस्टिमवर विनामास्क नाचणााऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर तालुका पाेलिसांनी ही कारवाई केली. नगर तालुक्यातील चास शिवारात चास ते अकोळनेर रस्त्यावर लक्ष्मण नामदेव कार्ले यांच्या मुलाच्या लग्नाची वरात काढण्यात अाली.
त्यासाठी मंगेश अरुण थोरात (रा. पाइपलाइन रोड, नगर) याचा साउंड सिस्टिम बुक करण्यात आली हाेती. थोरात याने टेम्पोत बसवलेल्या साउंड सिस्टिमवर गाणे वाजत हाेते. वरातीत लोक विनामास्क गर्दी करून नाचत होते.
त्यामुळे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी काॅन्स्टेबल संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण कार्ले,
साऊंड सिस्टिम मालक मंगेश थोरात या दोघांवर नगर तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण ४. १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.