Crime News : मोलकरणीच्या घरात सापडला तब्बल ६१ लाखांचा ऐवज !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  उच्चभ्रू सोसायट्यांत ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मोलकरीण म्हणून कामास जात दोनच दिवसानंतर गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करत असत.

त्यांच्याकडील सोने-चांदी अन् रोकड चोरून नेणाऱ्या मोलकरीण महिलेच्या घरातून पोलिसांना तब्बल ६१ लाखांचा ऐवज सापडला आहे. यामुळे पोलीस देखील आवक् झाले आहेत.

शांथी चंद्रन (वय ४३, रा. अन्नाई नगर, वेगनीकल, तिरूलअन्नमलई, तमिळनाडू) असे अटक केलेल्या मोलकरीणीचे नाव आहे. याप्रकरणी मधुबाला प्रवीण सेठिया (वय ६०, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या घरात चोरी झाली होती. फिर्यादीच्या घरी काम करण्यास आल्यानंतर शांथी हिने कपाटात ठेवलेले १० लाख ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

वानवडी पोलिसांनी शांथी हिला तमिळनाडूतून अटक केली. शांथीने पुणे शहरातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, खडक, समर्थ, लष्कर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाणे हद्दीतील उच्चभ्रू सोसायट्यांत घर कामगार म्हणून केले आहे.

चार ते पाच दिवस काम केल्यानंतर ती विश्‍वास संपादित करीत. त्यानंतर गुंगीचे औषध खाद्यपदार्थांत घालून घरातील दागिने चोरून नेत होती. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

Ahmednagarlive24 Office