अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अडीच लाख रुपये किंमतीच्या ४० कालवडी व १ गायीला उपाशीपोटी क्रूरपणे टेम्पोत कोंबून घेऊन चाललेल्या संगमनेर येथील दोघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जप्त करण्यात आलेल्या गोवंश जातीच्या या जनावरांना ठेवण्यासाठी राहुरीत नकार मिळाल्याने संगमनेर येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी धानोरे शिवारात राहुरी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर येथील सय्यद बाबा चौकातील आवेश हारुन मनीयार (वय ३०) व महंमद शमशाद नियाजउद्दीन शेख (वय ३०, राहणार भारतनगर) हे दोघे आपल्या ताब्यातील एमएच १४ डीएम ४३७४ या टेम्पोत ५० हजार रुपये किंमतीची १ गाय व गायीच्या ४० लहान कालवडींना कांेबून संगमनेर येथे घेऊन जात होते.
ही जनावरे कुणाच्या नजरेस पडू नयेत, यासाठी ताडपत्रीने झाकण्यात आली होती. लहानशा कालवडी व गाय घेऊन चाललेला टेम्पोतील अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल राहुरी पोलिसांनी जप्त केला.
संगमनेर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल जायभाय करीत आहेत. राहुरी येथे कत्तलीसाठी ४० लहान कालवडी व १ गायीला टेम्पोत घेऊन जाणाऱ्या दोघाविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या जनावरांची सुटका करून गोशाळेत पाठवण्यात आले.