अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीमधील कलाकार आत्महत्या करण्याचे सत्र सुरू आहे. दोन कलाकारांची आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना एकानंतर एक कलाकारांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहेत.
आता ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
प्रेक्षाला अभिनेत्री व्हायचे असल्यामुळे ती मुंबईत आली होती मात्र लॉकडाऊननंतर ती तिच्या घरी परतली. त्यानंतर लॉकडाऊन वाढत गेले आणि आता आपल्याला यापुढे काम मिळणार नाही या भावनेने ती डिप्रेशनमध्ये जात होती
आणि डिप्रेशनमध्येच तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती.
प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक निराशजनक पोस्ट लिहिली होती.
ज्यात तिनं लिहिलं, ‘सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न मरून जाणे’. सकाळी जेव्हा प्रेक्षाचे बाबा तिला उठवायला तिच्या रुममध्ये गेले
त्यावेळी त्यांनी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. त्यांनी तिला लगेच रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com