अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगारांनी प्रवरेच्या आयात कामगारास गुरुवारी काळे फासले असता तनपुरे कारखाना कामगार आंदोलकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचे गेल्या १२ दिवसापासून २५ कोटी ३६ थकीत देणी घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. बारा दिवसात विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.
बुधबारी सकाळी संतप्त कामगारांनी प्रवरेच्या आयात कामगारांना ‘चले जावं’ चा इशारा दिला होता. तरीही गुरुवारी प्रवरेचे काही कामगार तनपुरे कारखाना संलग्न संस्थेत आल्याचे दिसल्याने कामगारांनी यातील अविनाश खर्डे नामक कामगारास काळे फासले
त्यासंदर्भात अविनाश खर्डे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे आदिंसह इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खर्डे यांनी फिर्यादित म्हंटले
की, मी डॉ.तनपुरे कारखान्यात अकाउंटंट म्हणून नोकरी करत आहे. गुरुवारी ११ वाजेनंतर नर्सिंग होमच्या प्रांगणात असताना तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी एकत्रित येऊन तू जर इथे आला तर तुझे हात कापून मारून टाकू अशी धमकी देऊन
फिर्यादीतील आरोपी यांनी माझ्या अंगाला काहीतरी काळे लावून नुकसान केले. व जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी प्रकारची फिर्याद खर्डे यांनी लोणी पोलिस ठाण्यात दिली आहे.
लोणी पोलीस ठाण्यातील जावक क्रमांक ३१३२/ २०२१ दिनांक २ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात आंदोलक कामगारांविरुद्ध भादंवि कलम ३२६,३२६, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ करीत आहे.