अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- कपडे विकण्याचा बहाण्याने आलेल्या परप्रांतिय कपडे विक्रेत्यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अकोले तालुक्यातील वीरगावात घडली.
गुरुवारी 8 जुलै रोजी दुपारच्या वेळी ही मुलगी घरात एकटी असताना दोन परप्रांतिय तरुण घरात गेले. त्यातील सावेज भुरा कुरेशी याने घरात घुसून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुला फुकट कपडे देतो असे म्हणत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्यावेळी त्याचा साथीदार आसिफ वकील कुरेशी याने दारात थांबून त्याला साथ दिली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यातील एकजण पळून गेला. दुसर्याला पकडून नागरिकांनी चोप दिला.
दोघेही आरोपी रा. शिक्रापूर, ता. शहापूर, जि. ठाणे येथील असून ते मुळचे मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशचे आहेत. सध्या संगमनेर येथे ते वास्तव्यास आहेत. याबाबत 40 वर्षीय महिलेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.