अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे.
जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
त्याचर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते .