अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारची केंद्रावर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- महाराष्ट्राला केंद्राने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी साेमवारी नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. केंद्र सरकारकडून राज्य सरकारवर अन्याय हाेत असल्या आरोप होताे,

यावर बोलताना ते म्हणाले, केंद्राकडून १,७५० मॅट्रिक टन ऑक्सीजन साठा मिळत आहे, तसेच ४ लाख ३५ हजार रेमडेसेवीर मिळत आहे.

परंतु राज्य सरकार राज्यातील यंत्रणा सक्षम करण्यात कमी पडले आहे. कारण राज्याला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी व कर्तव्य आहे.

राज्याला माल उपलब्ध करण्यासाठी केंद्राशी समन्वय राज्य सरकारने साधला पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

मग रेमडेसिवीर जाते कुठे ?  नातेवाईकांना रेमडेसिवीर आणायला सांगू नका, रुग्णालयाने साठा दिलेला आहे. नातेवाईकांना सूचना दिले असताना,

रुग्णालयातील रेमडेसेवीर जाते कुठे ? त्याचा काळाबाजार होतोच कसा? असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यापुढे असे होता कामा नये, अशी ताकीदही दरेकर यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24