अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात एका लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्याने
तहसीलदार फसियोद्दीय शेख ,नायब तहसीलदार पुनम दंडिले यांच्या पथकाने जात वधु-वर पक्षासह मंगल कार्यालय व्यवस्थापकावर दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी यांनी सार्वजनिक समारंभ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तर लग्नसमारंभासाठी केवळ शंभर लोकांची परवानगी देण्यात आली आहे.
तरी देखील अनेक मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन लग्न सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदार शेख यांनी हि कारवाई केली आहे.
लग्न समारंभामध्ये वधू-वर पक्षापेक्षा काही अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे गर्दी होताना आढळून येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्याने वधूपक्ष वरपक्ष व मंगल यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून प्राथमिक स्वरूपात दंडात्मक कारवाई केली आहे.
मंगल कार्यालय चालकास दंडात्मक कारवाई करून आज मंगल कार्यालय सील करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे.
कोरणाची तिसरी लाट आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपली स्वतःची खबरदारी घ्यावी आणि कोरोनापासून आपल आणि समाजाचे संरक्षण करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.