गर्दी करणे भोवले: गणेश मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल…?

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   मागील वर्षा पासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक बंधने लादली आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करतात देखील विविध प्रकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते.

मात्र या नियमाचे उल्लंघन करणे येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील डावरे गल्ली येथे गणेश मंडळासमोर मास्क न घातलेल्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमवल्यामुळे मंडळाच्या अध्यक्षावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यातील पो.कॉ. सतिश मारुती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील डावरेगल्ली येथील सहकार्य युवा प्रतिष्ठान या गणेश मंडळाचे अध्यक्ष अमोल गोवर्धन गाढवे याने गणेश मंडळापुढे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केली.

या गर्दीतील एकाही युवकाने मास्क लावलेले नव्हते. पो.कॉ. सतिश शिंदे व त्यांचे सहकारी शनिवारी (दि.१८) रात्री 11.45 च्या सुमारास पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

या गणेश मंडळाच्या अध्यक्षाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे अध्यक्षाविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!