Petrol Diesel Price : देशात अजूनही महागाई वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही दिवसेंदिवस बदलत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे.
कारण देशात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत असताना पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. जाणून घेऊयात तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर.
सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवार 28 नोव्हेंबर 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या असून हे दर त्यांनी स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे आज सलग 189 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 78 पर्यंत खाली आली आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे $ 85 इतके आहे.
सरकारने याअगोदर 21 मे रोजी उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. त्यामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी दर कमी झाले होते. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्याचबरोबर केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली होती.
देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात असून मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
येथे सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल मिळते
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल मिळते. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर असून हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
येथे सर्वाधिक स्वस्त पेट्रोल आणि डिझेल इथे मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वाधिक स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
म्हणून देशात पेट्रोल आणि डिझेल महाग आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत दुप्पट होते. त्यामुळे परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलत असतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजच्या किमती जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलतात आणि त्या सकाळी 6 वाजता अपडेट होत असतात. या किमती तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून दर जाणून घेऊ शकतात.