Petrol Diesel New Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, पहा पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर…


देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel New Price : देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. तसेच कच्च्या तेलाच्या किमती उतरताच पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. तरीही देशात इंधनाच्या किमती कमी नाहीत. सलग २३५ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असताना भारतात इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $74 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $79 च्या जवळ पोहोचले आहे. कच्चे तेल इतके स्वस्त होऊनही पेट्रोल डिझेल महागच होत चालले आहे.

या राज्यांमध्ये 21 मे 2022 रोजी उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेल दर

दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये

कोलकत्ता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये

मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये

चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये