file photo

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्राची राजधानीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुसती गुन्हेगारी वाढत नाही तर माणूस पशु पेक्षाही हिंसक आणि निर्दयी बनत चालला असल्याचे दिसून येत आहे.

साकीनाका येथील घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरात एका जावयानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली आहे.

या क्रूर घटनेनं पुन्हा एकदा राजधानी हादरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून असून आरोपी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. नेमके प्रकरण काय आहे ?

जाणून घेऊ सविस्तर मुंबईमधील विले पार्ल्यातील ही घटना असून आरोपी एका चोरीप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत होता. तुरुंगातुन जामिनावर सुटून आल्यावर त्याला कळाले की त्याच्या बायकोने दुसरे लग्न केले आहे.

तसेच ती गरोदर आहे. आरोपीने पत्नीच्या घरी धाव घेतली आणि हे लग्न मोडून परत आपल्यासोबत संसार कर अशी मागणी केली. तेव्हा आरोपीचे त्याच्या पत्नी आणि सासूसोबत जोरदार भांडण झाले.

दुसर्‍या दिवशी आरोपीने सासूकडे आपला पत्नीबाबत विचारणा केली मात्र सासूने काही न सांगितल्याने आरोपीला याचा राग आला. त्याने सासूच्या डोक्यात टाईल्स घातली आणि चाकूने भोसकले.

त्यानंतर नराधमाने सासूच्या प्रायव्हेट पार्ट ठेचून सासूची हत्या केली. आरोपी फरार होऊन पुण्याला पळून गेला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पुण्याहून अटक केले तसेच त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.