तालिबान्यांची क्रूरता… एका समलैंगिक तरुणावर केला बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता सर्वत्र त्यांची दहशत पसरली आहे. आता हळूहळू तालिबान्यांचा क्रूर चेहरा जगासमोर येऊ लागला आहे.

कारण एक अशीच काहीशी धक्कादायक घटना घडली आहे. तालिबान्यांनी एका समलैंगिक तरुणावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमेरिकेने जेव्हापासून आपले सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेतले आहे, तेव्हापासून अफगाण महिला घाबरल्या आहेत. त्याचप्रमाणे एलजीबीटीक्यू समाजावर देखील तालिबान्यांची दहशत पसरली आहे.

यादरम्यानच एका वृत्तानुसार दोन तालिबान्यांनी एका समलैंगिक तरुणावर बलात्कार केला आणि त्याला मारहाण केली. तालिबानी तरूणांना हा तरूण गे असल्याचं समजलं होतं.

त्यांनंतर त्यांनी पीडित तरूणाला मैत्रीचं आमिष देत काबुलमध्ये सुरक्षित जागा देण्याचंही खोटं सांगितलं. तसेच त्याला देशातून बाहेर जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग दाखवण्याचंही सांगितलं होतं.

त्याला भेटायला बोलवून ताबिलानी तरूणांनी त्या तरूणासोबत अनैसर्गिक संबंध टेवले आणि त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेतला. त्यांना फोन सांगितलं की, तुमचा मुलगा गे आहे.

दरम्यान तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि सर्वत्र त्यांची दहशत पसरली. त्यामुळे अफगाण लोकं जीवाची परवा न करता देश सोडून जाताना दिसले.

अहमदनगर लाईव्ह 24