ताज्या बातम्या

cryptocurrency updates : 24 तासांत सर्वाधिक परतावा देण्याचा विक्रम मोडला !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  भारतात क्रिप्टोकरन्सी येणार की नाही याच उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे,परंतु लवकरच यावर सकारात्मक चर्चा घडू शकते असा विश्वास गुंतवणुकदारांना आहे.

क्रिप्टोकरन्सी कमी कालावधीत जलद वाढीसाठी ओळखल्या जातात. यापैकी मायक्रो टोकन त्यांच्या विचित्र युक्त्यांसाठी प्रसिद्ध होत आहेत.कमी मार्केट कॅपिटल आणि अत्यंत कमी लिक्विडीटी असूनही अशी टोकन्स केवळ एक किंवा दोन दिवसांत अल्ट्रा-मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात.

पण सगळेच गुंतवणूकदार अशा टोकन्समधून पैसे कमवू शकत नाहीत. कारण त्यांचा अंदाज बांधणे फार कठीण असते. स्क्विड गेम्सवर आधारित स्क्विड आणि कोकोस्वॅप ही याचीच प्रमुख उदाहरणे आहेत.आता अशीच आणखी एक क्रिप्टोकरन्सी समोर आली आहे, जिने 24 तासांत सर्वाधिक परतावा देण्याचा विक्रम मोडला गेला आहे.

मिळतोय तब्बल 2.35 लाख टक्के परतावा :- सूत्रांकडून मिळालेल्या डेटानुसार इथरियम मेटा (ETHM) ने गेल्या 24 तासांत 2.35 लाख टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सदर डिजिटल टोकन काही तासांत 2,37,000 टक्क्यांनी वाढले. या कालावधीत या टोकनची किंमत फक्त 0.00000005033 डॉलर वरून 0.0001194 डॉलरवर पोहोचली. सकाळी 11.30 वाजता ते 0.000006449 डॉलरवर व्यापार करत होते.

टोकनचे मार्केट कॅपिटल काय आहे? :- या टोकनचे एकूण मार्केट कॅप 8.5 मिलियन डॉलरपेक्षा थोडे अधिक होते. गेल्या एका दिवसात त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम 160 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. एकूण पुरवठा 99,000,000,000 आहे, जी या टोकनसाठी कमाल मर्यादा आहे. तर 50.01अब्ज ETHM टोकन चलनात राहिले आहेत.

ही ट्रेडिंग सावधगिरी मात्र महत्त्वाची आहे. :- तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जेथे लिक्वीडिटी कमी असेल तेथे कमालीची अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते.या नवीन कॉइनमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अशा गोष्टी लक्षात ठेवाव्यात. इथरियम मेटा हे क्रिप्टो जगात नवीन नाव नाही. हे कॉइन जवळपास तीन वर्षे जुने आहे. इथरियम मेटा मध्ये एक मोठी कमकुवतता आहे आणि ती म्हणजे गोपनीयतेची कमतरता.

गोपनीयतेची कमतरतेवर उपाय काय आहे?:-  झिरो-नॉलेज स्नार्क्स लागू केल्यानंतर इथरियम प्लॅटफॉर्मवर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मिक्सर नावाचा अपग्रेड जोडला जाईल.यामुळे यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल.याव्यतिरिक्त, हे कॉइन ई-मार्केटप्लेसचा पाया देखील आहे. परंतु, विश्लेषकांनी याला आणखी एक घोटाळा म्हटले आहे, जेथे चार्टवर किंमत वाढली आहे आणि कोणत्याही गुंतवणूकदाराला त्यांच्या खात्यांमध्ये कोणताही वास्तविक फायदा दिसत नाही.

Ahmednagarlive24 Office