अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हाला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही.
सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यासाठी आमचा विरोध आहे.
तसेच निर्णयाचा फेरविचार केला नाही तर भाजप कार्यकर्ते पीएमपीएल च्या प्रत्येक स्टॉपवर आंदोलन करतील असे भाजपा खासदार गिरीश बापट म्हणाले. पुण्यात संचारबंदी व पीएमपीएमएल सेवा बंद या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे.
हा विरोध दर्शवण्यासाठीच खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या ॲाफिस बाहेर आंदोलन केले.
यावेळी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.तसेच संचारबंदीचा आदेश आपण पाळणार नसल्याचे मुळीक यांनी यावेळी जाहीर केले आहे. मात्र, इतर कार्यकर्त्यांनी देखील इथे हजेरी लावली.
पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बापट आणि मुळीक यांची भेट घेत त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन संपवण्याची विनंती केली.मात्र यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत माघार घेण्यास नकार दिला.
यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुळीक म्हणाले, सरकारने हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. पीएमपीएमएल वर अनेक सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत.
या बसेस बंद करण्याचा निर्णय योग्य नव्हता. तरी देखील हा निर्णय घेतला आहे. कारण नसताना संचारबंदी लावली आहे. या अर्धवट लॉकडाउन चा परिणाम खुप मोठा होणार आहे.
सरकारने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना पॅकेज दिलं पाहीजे. त्यामुळे आम्ही संचारबंदीचा आदेश मोडणार आहोत.