अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी खबदारीचे आणखी एक पाऊल उचलले आहे.
येत्या दि. १५ एप्रिलच्या कालावधीत जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सार्वजनीक ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे.
तसेच विना मास्क फिरणारांकडून रु. ५००, सार्वजनीक ठिकाणी थुंकल्यास रू. एक हजार दंड वसूल केला जाणार आहे. तसेच ५० व्यक्तींच्या मर्यादेतील लग्न समारंभ वगळता धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिबंध केला आहे.
काल रविवार रोजी जिल्हाधिकारी यांचे हे आदेश जारी केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी माहिती दिली.
मागील काही दिवसांपासून जिल्हयात कोरोना बाधितांची घटलेली संख्या पुन्हा वाढू लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेने प्रशासन यंत्रणांना सतर्क केले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी विविध प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे मुद्देनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध प्रशासकिय अधिकारी यांना जबाबदारीचे वाटप करीत यापूर्वीच निर्देश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, बुधवार रोजी मास्क, सॅनेटायझरचा वापर व सोशल डिस्टंटचे पालन विविध संस्था, अस्थापनात काटेकोरपणे करण्याबाबत कारवाईचे अधिकार तहसीलदार, घटना व्यवस्थापक व नगर परीषद, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रदान करीत आदेश जारी झाला आहे.
आता येणाऱ्या काही दिवसात होळी, धुलीवंदन, रंगपंचमीसारख्या सण- उत्सवात गर्दी होवून संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने गुरूवार दि. २५ रोजी सार्वजनीक स्वरूपात उत्सवास प्रतिबंध केला.
खाजगी जागेत, गृहनिर्माण संस्था परिसरात, सार्वजनीक स्थळी होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करता येणार नाही. शासनाच्या सुधारीत निर्देशानुसार काल रविवार रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नवे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.
यानुसारतसेच इतर कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात करण्यात या आदेशाने दि. १५ एप्रिल मनाई करण्यात आली आहे. लग्ना समारंभास ५० व्यक्तींच्या मर्यादेत अटी- शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे.