अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गुरूवारी पुण्यावरून 700 आणि अन्य ठिकाणावरून 1 हजार 200 रेमेडिसिवर इंजेक्शन प्राप्त झालेले होते. त्याचे जिल्ह्यातील होत आहे. तसेच सध्या स्थितीला जिल्ह्यात सध्या 2 हजार 500 इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे.
दरम्यान कोरोनावर काहीसे उपयुक्त ठरत असलेले रेमेडिसिवर इंजेक्शनचा कालबाजर सुरु झाला आहे. यामुळे सार्वमशानाय नागरिकांना यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो आहे.
यातच याला आळा बसावा यासाठी काल राज्याचे आरोग्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहे. करोनावर उपचार घेणार्या रुग्णांना रेमेडिसिवर इंजेक्शनची कमरता भासू नयेत, यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग दक्ष आहे.
जिल्ह्यात सध्या 2 हजार 500 इंजेक्शनचा साठा असून पुणे, बेंगलोर आाणि हैद्राबाद येथील कंपन्यांकडे 9 हजार 500 इंजेक्शनचे अगाऊ पैसे भरलेले आहेत. त्यानूसार साधारणपणे दररोज 1 ते 1500 इंजेक्शन उपलब्ध होत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, अन्न आणि औषध विभागाने जिल्ह्यातील रेमेडिसिवर इंजेक्शन साठ्याचे नियोजन केले आहे.
नगर शहरातील 17 औषधांच्या ऐजन्सी, फार्मा, मोठ्या हॉस्पिटलचे मेडिकल स्टोअर्स यांच्या तर केडगावमधील 2 मेडिकलकडे, संगमनेरमधील 10, श्रीरामपूरमधील 3, कोपरगावमधील 10,
प्रवरा नगरमध्ये 1 तर शेवगाव आणि जामखेडमध्ये प्रत्येकी 1 एका ठिकाणी रेमेडिसिवर इंजेक्शनसाठा उपलब्ध असल्याची यादी अन्न- औषधकडून देण्यात आली आहे.