Bank Holidays Alert : जर तुमचे बँकेशी निगडित काही काम असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण डिसेंबरमध्ये एकूण 14 दिवस बँक बंद असणार आहेत. सुट्ट्यांबाबत RBI ने एक लिस्ट जाहीर केली आहे.
त्यामुळे तुम्ही पुढच्या महिन्यात बँकेत जाणार असाल तर ही यादी पाहूनच बँकेत जा नाहीतर तुमचे महत्त्वाचे काम अडकून पडेल. देशभरात बँकांना सणासुदीच्या किंवा स्थानिक सुट्ट्या असतात. जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेत जाणार असाल तर सुट्यांची यादी पाहून बँकेत जा नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
8 दिवस बंद राहणार बँक
लिस्टनुसार RBI ने पुढच्या महिन्यात एकूण 8 सुट्ट्या जारी केल्या आहेत. असे जरी असले तरी 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. 8 दिवस सोडून बाकीचे वीकेंड असणार आहेत. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या की सर्व राज्ये किंवा प्रदेश एकूण 14 दिवसांसाठी बंद राहणार नाहीत. या सुट्ट्यांनुसार देशातील विविध भागातील बँका बंद राहतील
उदाहरण सांगायचे झाले तर शिलाँगमधील पा-टोगान नेंगमिंजा संगमासाठी बँक शाखा बंद केल्या जाऊ शकतील परंतु गोवा, बिहार किंवा इतर राज्यांमध्ये त्या बंद नाहीत.
अशी आहे यादी
सेंट फ्रान्सिस झेवियर उत्सव : 3 डिसेंबर
पा-टोगन नेंगमिंजा संगमा: 12 डिसेंबर
गोवा मुक्ती दिन : 19 डिसेंबर
ख्रिसमस सण: 24 डिसेंबर
ख्रिसमस सेलिब्रेशन / लोसुंग / नामसंग: 26 डिसेंबर
गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस : 29 डिसेंबर
यू कियांग नांगबा: 30 डिसेंबर
नवीन वर्षाची संध्याकाळ: डिसेंबर 31
वीकेंड
दुसरा शनिवार: 10 डिसेंबर
रविवार: 4 डिसेंबर
रविवार: 11 डिसेंबर
रविवार: 18 डिसेंबर
चौथा शनिवार: 24 डिसेंबर
रविवार: 25 डिसेंबर