Bank Holidays in January : जर तुमचे बँकेत खाते असेल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पुढचे काही दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर ते आजच पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
लक्षात घ्या की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँका बंद राहणार आहेत. म्हणून तुम्ही जर बँकेत जाणार असाल तर सुट्टी पाहूनच बँकेत जा नाहीतर तुमची अडकू शकतील. तुमचे काम लवकर पूर्ण होणार नाही. पाहुयात सविस्तरपणे सुट्ट्यांची यादी…
आजही सुट्टी आहे
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातील सर्व बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक बँकांच्या सर्व शाखा RBI ने दिलेल्या यादीनुसार बंद राहणार आहेत. या कालावधीत ऑनलाइन आणि नेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत.
चार दिवस बंद राहणार बँका
शनिवार, 28 जानेवारी 2023: चौथा शनिवार असल्याने सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
रविवार, 29 जानेवारी 2023: तसेच रविवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. 2015 मध्ये, RBI ने जाहीर केले की भारतातील खाजगी आणि PSU बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतील.
सोमवार, 30 जानेवारी 2023: बँक कर्मचाऱ्यांचा संप
मंगळवार, 31 जानेवारी 2023: बँक कर्मचाऱ्यांचा संप
लवकर करा काम
जर तुमचे काही काम असेल तर ते उद्याच पूर्ण करा कारण शनिवारपासून मंगळवारपर्यंत बंद राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या दैनंदिन कामावर परिणाम होईल, असे एसबीआय बँकेने अगोदरच सांगितले आहे.
कामकाजावर होणार परिणाम
SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी निगडित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी करण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे.