PNB Hikes Interest Rates : ग्राहकांना मिळाली नववर्षाची भेट! व्याजदर आणि मुदत ठेवींवर झाली ‘इतकी’ वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PNB Hikes Interest Rates : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

कारण बँकेने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. PNB ने बचत खात्यावरील व्याजदर आणि मुदत ठेवींवर मोठी वाढ केली आहे.हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

बचत खात्यातील व्याज दर

गुंतवणूकदारांना बचत खात्यातील 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर वार्षिक 2.70 टक्के व्याज मिळेल. तर  दुसरीकडे, जर तुमच्या बचत खात्यात 10 लाख ते 100 कोटी रुपये असतील तर तुम्हाला वार्षिक 2.75% दराने व्याज मिळेल.

त्याचबरोबर 100 कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त बचत खात्यावरील ठेवींवर व्याजदरात 25 आधार अंकांनी वाढ केली आहे. आता 2.75% ऐवजी गुंतवणूकदारांना 3% दराने व्याज मिळणार आहे.

इतके मिळेल व्याज 

बँकेने 1 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याजदर 45 बेस पॉइंट्सने 665 दिवसांपर्यंत वाढ केली आहे. गुंतवणूकदारांना आता 6.30% ऐवजी 6.75% व्याज मिळेल. 667 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 6.75% व्याज दर मिळेल, जो जुन्या 6.30% च्या दरापेक्षा 45 bps जास्त आहे. बँकेने दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून यावर आता 6.75% व्याज मिळेल.

7 ते 45 दिवसांच्या एफडीवर – 3.50% व्याजदर
46 ते 179 दिवसांच्या एफडीवर – 4.50% व्याजदर
180 ते 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर – 5.50% व्याजदर
666 दिवसांच्या एफडीवर व्याजदर – 7.25%व्याजदर
तीन वर्ष ते दहा वर्षांपर्यंत एफडीवर – 6.50% व्याजदर