DA Hike : 16 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याने सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजून आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही.
पण लवकरच नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल आणि ही समिती आपल्या शिफारशी सरकारकडे सोपवेल आणि त्यानंतर मग 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होईल असा अंदाज समोर येतोय.

परिणामी सध्या संपूर्ण देशात आठवा वेतन आयोगाची चर्चा आहे, पण आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून जानेवारी 2025 पासून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
खरे तर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते. पहिले मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाते. यानंतर मग ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जात असते.
ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली होती. आता या चालू महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. एआयसीपीआयच्या जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56% होणार आहे.
केव्हा होणार निर्णय ?
मीडिया रिपोर्ट नुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाची पाच मार्च 2025 रोजी एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. याच बैठकीत केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. अर्थात पाच मार्च 2025 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56 टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो.
म्हणजेच मार्च महिन्याच्या पगारांसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार असल्याने त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.