ताज्या बातम्या

DA Hike Update : रक्षाबंधनानंतर मिळणार आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांचा DA 4 टक्क्यांनी वाढणार, पगारात होणार ‘इतकी’ वाढ, पहा ताजे अपडेट

Published by
Ahmednagarlive24 Office

DA Hike Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आणखी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कामगार मंत्रालयाकडून गेल्या सहा महिन्याचे म्हणजे जून महिन्यापर्यंतचे AICPI निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत. या निर्देशांकामध्ये 1.7 अंकाची वाढ होऊन तो 136.4 अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ होणार आहे.

AICPI निर्देशांक जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसऱ्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ केली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्के होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे. तसेच पेन्शनधारकांना देखील मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. पहिली DA वाढ जानेवारी ते जून महिन्या दरम्यान केली जाते. तर दुसरी DA वाढ जुलै ते डिसेंबर महिन्यामध्ये केली जाते. दार सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते.

सध्या कर्मचाऱ्यांचा DA मार्च महिन्यात ४ टक्क्यांनी वाढल्याने ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ झाली तर त्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो. याचा फायदा देशातील १ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

जुलैपासून मिळणार DA वाढीचा लाभ

२०२३ यावर्षी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मार्च महिन्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र मार्च महिन्यामध्ये जरी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून लाभ दिला गेला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जरी दुसरी DA वाढ झाली तरी कर्मचाऱ्यांना जुलै २०२३ पासून लाभ दिला जाणार आहे.

पगार किती वाढणार

जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ झाली तर त्यांचा पगार किती वाढणार हे एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊया. एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याला ४२ टक्के DA दराने 7560 महागाई भत्ता मिळत आहे. जर कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के झाला तर त्यांना 8280 रुपये दरमहा महागाई भत्ता मिळेल.

Ahmednagarlive24 Office