अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याच्या बाजूस, न्हावरे आलेगाव पागा रस्त्यावर एका पालामध्ये शिरूर पोलिसांनी छापा टाकला.
यात तब्बल ७८ किलो गांजा किंमत १६ लाख ३८ हजार जप्त केला असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
पोलिस निरीक्षक खानापुरे यांना गोपनीय बातमीदाराने न्हावरा गावच्या हददीत न्हावरा ते आलेगांव पांगा या गावाकडे जाणा-या रोडच्या उत्तरेस एका पालामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणुक करून ठेवलेली आहे.
अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे शिरूर पोलिसांनी त्या पालाच्या चारही बाजूने सपळा रचून पालावर छाप टाकला असता, त्या पालात चार इसम बसले असल्याचे आढळून आले.
अधिक तपास केला असता दोन गोणी खाकी कागदात व प्लाष्टीकमध्ये गुंडाळलेले एकूण पस्तीस पुडे मिळून आले. सदर पुड्यात गांजा असल्याचे निषपन्न झाले त्यानंतर मुद्देमलासह सुनिल रूपराव पवार,
आकाश सर्जेराव पवार, विशाल कैलास मोहिते, प्रकाश सर्जेराव पवार ( सर्व रा. टाकरखेड ता.विखली जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.